नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद आणि आचार्य देवव्रत यांची शनिवारी अनुक्रमे बिहार आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. १९९४ ते २००६ दरम्यान दोनदा राज्यसभेचे सदस्य राहिलेले ६९ वर्षीय कोविंद हे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहेत. व्यवसायाने वकील असलेले कोविंद हे भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुखही होते. डॉ. देवव्रत हे हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्राचे प्राचार्य असून प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोविंद बिहारचे, देवव्रत हिमाचलचे राज्यपाल
By admin | Published: August 09, 2015 1:17 AM