अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 21:58 IST2024-12-24T21:58:24+5:302024-12-24T21:58:46+5:30
Governor Posting order: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी
Governor Posting order: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती भवनातून मिळालेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी लष्करप्रमुख व्ही के सिंग यांना मिझोरामचे राज्यपालपद देण्यात आले आहे.
Ajay Kumar Bhalla appointed as Governor of Manipur.
— ANI (@ANI) December 24, 2024
Dr Hari Babu Kambhampati, Governor of Mizoram appointed as Governor of Odisha. General (Dr) Vijay Kumar Singh, appointed as Governor of Mizoram. Rajendra Vishwanath Arlekar, Governor of Bihar appointed as Governor of Kerala.… pic.twitter.com/RgPVS5u68n
मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांना ओडिशाची जबाबदारी दिली आहे. तसेच, बिहार आणि केरळच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.