शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

7000 कोटींची संपत्ती, श्रीराम मंदिरासाठी सर्वात मोठे दान; BJP ने दिली राज्यसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 6:12 PM

जाणून घ्या कोण आहेत गोविंद ढोलकिया..?

Govind dholakia Rajya Sabha : भारतीय जनता पक्षाने आज गुजरातमधून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यात गुजरातच्या डायमंड सिटीतील प्रतिष्ठित हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांचेही नाव आहे. गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत आहेत. मात्र, विधानसभेतील भाजपचे संख्याबळ पाहता राज्यसभा निवडणूक केवळ औपचारिकता मानली जात आहे. पक्षाच्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. 

गोविंद ढोलकिया चर्चेतगेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा केली, त्यानंतर गुजरातचे डायमंड किंग गोविंद ढोलकिया प्रसिद्धीच्या झोतात आले. याचे कारण म्हणजे, त्यांनी श्रीराम मंदिरासाठी सर्वाधिक 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंद ढोलकिया, हे प्रसिद्ध राम कथाकार मोरारी बापू यांचे अनुयायी मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा दोन दशकांहून अधिकचा परिचय आहे. 

कोण आहेत बालयोगी उमेशनाथ महाराज? भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

नोकरी सोडून बनले डायमंड किंग 7 नोव्हेंबर 1947 रोजी दुधाळा गावात जन्मलेले गोविंद ढोलकिया 'काका' नावाने प्रसिद्ध आहेत. सुरतला डायमंड हब बनवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. श्रीराम कृष्णा एक्सपोर्ट डायमंड कंपनीचे ते मालक आहेत. गोविंद ढेलकिया यांनी फक्त सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 1964 मध्ये त्यांनी सुरतेतून करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगचे काम केले. काही वर्षांनंतर त्यांनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट कंपनीची स्थापना झाली. हिरे व्यवसायात उडी घेतल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

गावाला सोलर व्हिलेज केलेगोविंद ढोलकिया हे मूळचे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहेत. त्यांनी त्यांच्या मूळ गावी दुधाळा येथे सुमारे 850 कुटुंबांना सोनल पॅनेल रूफटॉप भेट दिले आहेत. यासह दुधाळा हे देशातील पहिले गाव ठरले आहे, जे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय 100 टक्के सौरऊर्जेवर चालते. गोविंद ढोलकिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातील संघर्षाचा उल्लेख केला आहे. त्यांचे आत्मचरित्र 'डायमंड्स आर फॉरएव्हर, सो आर मोरल्स' या नावाने प्रकाशित झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोविंद ढोलकिया यांना सात भाऊ आणि बहिणी आहेत. राम कथाकार मोरारी बापूंच्या शिकवणीचा ढोलकिया यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाGujaratगुजरातRam Mandirराम मंदिर