शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कफ सिरपवर बंदी येणार? नशेसाठी होतोय वापर, खासदारांच्या मागणीवर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 2:44 PM

केंद्र सरकार लवकरच कोडीन आधारित कफ सिरपच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीचा निर्णय घेऊ शकतं. यासंदर्भातील धोरणाचा सध्या आढावा घेतला जात आहे.

नवी दिल्ली-

केंद्र सरकार लवकरच कोडीन आधारित कफ सिरपच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीचा निर्णय घेऊ शकतं. यासंदर्भातील धोरणाचा सध्या आढावा घेतला जात आहे. कफ सिरपचा औषधापेक्षा नशेसाठी जास्त वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. कोडीन असलेल्या कफ सिरपवर बंदी घालण्याची मागणी या खासदारांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली होती. त्याआधारे आरोग्यमंत्र्यांनी मार्चमध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) या प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यास सांगितलं होतं. आता DCGI ने आढावा अहवाल आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.

कोडीन हे अफूपासून बनविलेले एक वेदनाशामक आहे, जे सामान्यतः खोकला, वेदना आणि अतिसाराच्या उपचारांमध्ये वापरले जाते. हे अफूच्या अर्कामध्ये आढळणारे नैसर्गिक वनस्पती-व्युत्पन्न अल्कलॉइड आहे. कोडीन वापरून बनवलेले काही सुप्रसिद्ध ब्रँड म्हणजे फायझर कंपनीचे कोरेक्स, अॅबॉटचे फेन्सेडिल आणि लॅबोरेट फार्मास्युटिकल्सचे एसकाफ. उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कोडीनशी संबंधित औषधांसाठी नियम कडक करण्याची गरज आहे. यासंदर्भात एक सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबला जाण्याची शक्यता आहे.

एनसीबीकडून 2015 पासून बंदीची मागणीकोडीनयुक्त कफ सिरपवर 2015 पासून बंदी घालण्याची मागणी होत असली तरी त्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. 2017 मध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने DCGI ला त्याची उपलब्धता कमी करण्यास सांगितले होते. या औषधाचा नशा म्हणून गैरवापर होत असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. अशा परिस्थितीत, त्याची उपलब्धता कमी केली पाहिजे जेणेकरून ब्युरोला ते बाजारात सहज ओळखता येईल. कोडीनवर आधारित औषधांवर बंदी आणि NCB च्या हस्तक्षेपावर आवाज उठल्यानंतर, अनेक औषध कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय सिरपमध्ये त्याचे प्रमाण बदलले आहे. उदाहरणार्थ, Alembic Pharma ने त्याच्या लोकप्रिय कफ सिरप ग्लायकोडिनमधून कोडीन काढून टाकलं आहे.

डोकं, शरीर सुन्न करतं कोडीनराज्यसभा सदस्य अजय प्रताप सिंह, तामिळनाडूतील डॉ. केरळमधील डॉ. व्ही. शिवदासन, इलामाराम करीम, महाराष्ट्रातील फौजिया खान आणि ओडिशातील अमर पटनायक या खासदारांनी अशा कोडीन आधारित कफ सिरपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सिंग यांनी 15 मार्च रोजी राज्यसभेत असेही सांगितले होते की, आजकाल बाजारात कोरेक्स सिरप हे अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांसाठी महत्त्वाचं उत्पादन बनलं आहे. कोरेक्स हे कफ सिरप असलं तरी त्याचा वापर उपचारापेक्षा नशेसाठी जास्त होतो. सिंग यांच्या मुद्द्याला इतर अनेक खासदारांनीही पाठिंबा दिला. त्याचा वापर करून मेंदू आणि शरीर पूर्णपणे सुन्न होतात, असा इशारा त्यांनी दिला. आजकाल तरुणांमध्ये त्याचा वापर झपाट्यानं वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

कफ दाबण्यासाठी कोडीनचा उपयोगकोरेक्स कफ सिरपची निर्मिती यूएस फार्मा कंपनी फायझर करते. हे अनेक औषधांचे मिश्रण आहे, ज्याचा वापर कोरड्या खोकल्याच्या उपचारात केला जातो. तथापि, सर्व प्रकारांमध्ये कोडीन नसते. कोरेक्स टी कॉफ सिरप (Corex T Cough Syrup) हे दोन औषधांचे मिश्रण आहे - कोडीन आणि ट्रायप्रोलिडाइन. कफ दाबण्यासाठी कोडीनचा वापर केला जातो. हे कोडीन मेंदूतील खोकला केंद्राची क्रिया कमी करते. त्याच वेळी, ट्रायप्रोलिडाइन अँटी-एलर्जिक म्हणून कार्य करते.

कफ सिरप कशापासून बनवलं जातंसुरुवातीला अफू, हेरॉईन, क्लोरोफॉर्म आणि मॉर्फिन यांसारखे पदार्थ कफ सिरपमध्ये वापरले जात होते. नंतर त्यांच्यावर बंदी आणल्यानंतर आणि ते नियंत्रित केले गेल्यानंतर संश्लेषण किंवा सिंथेसिस केलेले पदार्थ यात वापरले जाऊ लागले. आज, अनेक उत्तम संशोधनावर आधारित अनेक घटक कफ सिरपमध्ये वापरले जातात, जे संश्लेषित करून बनवले जातात. तरीही आजही सर्दी, खोकला, श्लेष्मासाठी जे कफ सिरप विकले जातात त्यांचे काही संभाव्य हानिकारक परिणाम होऊ शकतात. डेक्सट्रोमेथोरफान रसायन (डेक्स्ट्रोमेथोर्फन -डीएक्सएम) सध्याच्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये वापरलं जातं. याशिवाय प्रोमेथाझिन-कोडीन आणि बेंझोनॅटेटपासून कफ सिरप बनवले जातात. जरी ते संश्लेषित केलेले असतात आणि खोकल्याच्या सिरपमध्ये वापरले जाते, तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की DXM आणि प्रोमेथॅझिन (promethazine) हे कोडीन ओपिओइड घटक आहेत. म्हणजेच त्यात अफूचा वापर केला जातो.

टॅग्स :Healthआरोग्य