Rahul Gandhi: गॅस, डिझेल, पेट्रोलमधून मोदी सरकारनं २३ लाख कोटी कमावले, गेले कुठे?; राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:27 PM2021-09-01T17:27:10+5:302021-09-01T17:27:41+5:30
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला आहे.
The government earned Rs 23 Lakh Crores through GDP - not the Gross Domestic Product but the Gas-Diesel-Petrol. Where did this Rs 23 Lakh Crores go?: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/DfmnN6MVOM
— ANI (@ANI) September 1, 2021
"मोदी सरकारनं गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. देशात डिमोनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचं मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचं डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असाही टोला राहुल यांनी यावेळी लगावला.
People can argue that there is rise in prices of petrol & diesel in int'l market. During the UPA govt in 2014, crude oil was priced at Rs 105, today it's Rs 71 - it was 32% higher at our time. Gas was priced at Rs 880 in our time, today it's Rs 653 - 26% lower today: Rahul Gandhi pic.twitter.com/jRM2nQpBoZ
— ANI (@ANI) September 1, 2021
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल यांनी यूपीए सरकारच्या काळातील गॅसच्या किमतीची आठवण करुन दिली. २०१४ साली जेव्हा यूपीएचं सरकार संपुष्टात आलं होतं त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये इतका होता आणि आज हाच दर ८८५ रुपये इतका झाला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ११६ टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर २०१४ सालापेक्षा सध्या ४२ टक्क्यांनी आणि डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत, अशी आकडेवारी राहुल यांनी सादर केली.
Modi ji keeps saying that GDP is rising, Finance Minister says that GDP is showing an upward projection. I then understood what does it mean by GDP. It means 'Gas-Diesel-Petrol'. They have this confusion: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/oMnKvvOvWu
— ANI (@ANI) September 1, 2021