NTA UGC NET Exam 2021 postponed: गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकजा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय घेत UGC NET ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मंगळवारी २० एप्रिल रोजी पत्रक काढून याबाबत माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे. २०२० सायकलसाठी (मे २०२१) UGC NET ही परीक्षा २ मे ते १७ मे २०२० या कालावधीत कंम्प्युटर मोडमध्ये होणार होती. परंतु सध्याची परिस्थिती आमि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पाहता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं एनटीएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
UGC NET postponed: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर UGC NET परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 5:58 PM
२ मेपासून पार पडणार होत्या परीक्षा. NTA नं जारी केलं पत्रक
ठळक मुद्दे२ मेपासून पार पडणार होत्या परीक्षा.