नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य करत सपाचे खासदार एस.टी. हसन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच कुठल्याही धर्माच्या वैयक्तिक बाबीत सरकारने हस्तक्षेप करता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ''कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये पती-पत्नीने विभक्त होणे हाच एक मार्ग उरतो. मग अशा परिस्थितीत पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देणेच योग्य ठरते. तसेच केवळ हजरत अबू हनिफा यांना मानणारे लोकच एकावेळी तीन तलाक देतात. आता अबू हनिफांना मानणाऱ्यांसोबत निकाह करावा का हे मुलीच्या कुटुंबीयांवरच सोडणे योग्य ठरेल.'' असे एसटी हसन यांनी सांगितले.
पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले, सपा खासदाराची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 2:39 PM