नवी दिल्ली- केंद्र सरकार लोकांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीप्पणी केल्यानंतर केंद्र सरकारनेसोशल मीडिया हब योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने सोशल मीडिया कम्युनिकेशन हब तयार करण्याचे धोरण आखले होते. त्याविरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.गेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी या याजनेतून केंद्र सरकार लोकांच्या व्हॉटसअॅपवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असून भारताचे रुपांतर सर्विलियन्स स्टेटमध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे असे मत मांडले होते.सोशल मीडिया कम्युनिकेशन हब म्हणजे काय ?ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंटस इंडिया लिमिटेडने या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या होत्या. सोशल मीडियातील बातम्या ब्लॉग्ज संदर्भातील सर्व माहिती व इतर महत्त्वाच्या नोंदी यांची माहिती त्याचवेळेस सरकारला उपलब्ध करुन द्यावी यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामासाठी ही निविदा मागवण्यात आली होती. यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी माहिती गोळा करुन सरकारला पुरवण्यात येणार होती.
तुमच्या व्हॉट्सअॅप, FBवर 'तिसरा डोळा' नाही; केंद्राने सोशल मीडिया हब गुंडाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:42 PM