नवी दिल्ली : सात टप्प्यांत पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) व व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीहीपॅट) यंत्रांची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ही माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत काही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे हॉटेल, रस्त्यांवर तसेच एका आमदाराच्या घरात ठेवल्याचेही आढळून आले होते. त्यामुळे हे पाऊल उचलले आहे.यासंदर्भात प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करणाºया वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी त्यांची ने-आण होते आहे की नाही यावर बारीक लक्ष ठेवता येईल. तसेच काही गैरप्रकार झाल्यास त्वरित कारवाई करणेही सोपे जाईल.आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग देशभरात १०.३५ लाख मतदान केंद्रे उभारणार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत हाच आकडा ९.२८ लाख इतका होता. याचा अर्थ येत्या निवडणुकांत मतदान केंद्रांची संख्या १०.१ टक्क्यांनी वाढणार आहे.निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांत देशभरातील मतदान केंद्रांच्या ठिकाणांची फेरआखणी केल्याने बदल झाला.लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत विविध टप्प्यांत पार पडणार असून त्यांचा निकाल २३ मेला जाहीर होईल.
ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या वाहनांवर जीपीएसची नजर; आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 3:41 AM