शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

निम्म्याच टँकरवर जीपीएस यंत्रणा

By admin | Published: June 11, 2014 12:24 AM

बीड : टँकरच्या बनावट फेऱ्यांना अंकुश लागावा यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला;

बीड : टँकरच्या बनावट फेऱ्यांना अंकुश लागावा यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला; परंतु निम्म्याच टँकरवर यंत्रणा कार्यान्वित आहे़ दरम्यान, जीपीएस न बसविणाऱ्या कंत्राटदारांना सीईओंनी पत्र पाठवून देयके रोखण्याची तंबी ़दिली आहे़टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी टँकर लावले जातात़ मात्र, कंत्राटदार कमी फेऱ्या असतानाही त्या जास्त दाखवून नियमांचे उल्लंघन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ अशा गैरप्रकारांना पायबंद लागावा म्हणून जीपीएस (ग्लोबल पोझिशन्स सिस्टम) नावाची यंंत्रणा अस्तित्वात आली़ या यंत्रणेमुळे टँकरच्या फेऱ्यांचे चित्रीकरण होणे सुकर झाले़ त्यामुळे जीपीएसवरील नोंदीप्रमाणेच बिल काढण्यात येणार होते़ जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा यंदा टंचाईच्या झळा कमी होत्या़ आजघडीला एकूण १६२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो; परंतु त्यापैकी केवळ ८१ टँकरवरच जीपीएस यंत्रणा लावली आहे़ उर्वरित ८१ टँकर अद्यापही विना जीपीएस धावत आहेत़ दरम्यान, जीपीएस यंत्रणेसाठी नोडल अधिकारी म्हणून सीईओ राजीव जवळेकर यांची नियुक्ती केलेली आहे़ शिवाय जीपीएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जि़प़ च्या पाणीपुरवठा विभागात उपकरण ठेवले आहे़ तेथे वेळोवेळी कुठल्या टँकरला जीपीएस यंत्रणा लावली किंवा नाही हे तपासले जाते. त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी राम यांनी देखील जीपीएस संदर्भात यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली नाही म्हणून ३० एप्रिल रोजी कंत्राटदार एच़ पी़ घुमरे यांना राजीव जवळेकर यांनी एक पत्र दिले आहे़ जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा देयके रोखण्यात येतील, असा इशारा जवळेकर यांनी या पत्रात दिला आहे़कंत्राटदार एच़पी़ घुमरे म्हणाले, जीपीएस यंत्रणा सुरुवातीला काही टँकरवर कार्यान्वित नव्हती;पण आता सर्व टँकरवर यंत्रणा बसविली आहे़ शासन नियमांचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले़‘बीडीओं’ना सूचनायासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ डी़ वहाने म्हणाले, गेल्या आठवड्यातच सर्व गटविकास अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे़ जीपीएस यंत्रणेशिवाय एकही टँकर धावता कामा नये, अशा सूचना दिलेल्या आहेत़ जेथे कुठे टँकरला जीपीएस यंत्रणा कार्यान्वीत केली नाही तेथील अहवाल मागवून नंतर कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)जीपीएस कोठे?तालुका टँकरसंख्यापाटोदा६शिरुर५धारुर५गेवराई३बीड२४आष्टी ३३केज५कारवाई करण्याची भाजयुमोची मागणीभाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राम खाडे म्हणाले, जीपीएस यंत्रणेला खोडा घालण्यामागे ‘अर्थ’कारण आहे़ अधिकारी व कंत्राटदारांच्या संगणमताने जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ नियम डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे़