शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

जीपीएसमुळे महागणार मोबाइल

By admin | Published: July 10, 2017 4:26 PM

आता सर्वसामान्य नागरिकांना साधे फोन मिळण्याऐवजी जीपीएस असलेले महाग फोन घ्यावे लागतील

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.10- दूरसंचार विभागाच्या निर्णयामुळे मोबाइल हॅंडसेटची किंमत वाढणार आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनची (आयसीए) याचिका दूरसंचार खात्याने आज फेटाळून लावली आहे. 1 जानेवारी 2018 पासून प्रत्येक हॅंडसेटमध्ये जीपीएसची सोय असणे बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयावर दूरसंचार विभाग ठाम राहिला आहे. या निर्णय़ावर पुनर्विचार करण्याची मागणी आयसीएने केली होती. परंतु महिलांच्या संरक्षणासाठी मोबाइलमध्ये जीपीएसची सोय असणे अत्यावश्यक असल्याची भूमिका दूरसंचार विभागाने कायम ठेवली आहे. आयसीएची विनंती फेटाळून लावताना या विषयावर यापुढे कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही असेही विभागाने स्पष्ट केले आहे. आता जीपीएसची सोय प्रत्येक मोबाइलमध्ये करावी लागल्यामुळे साहजिकच हॅंडसेटची किंमत वाढणार असून, सर्वसामान्य नागरिकांना साधे फोन मिळण्याऐवजी असे जीपीएस असलेले महाग फोन घ्यावे लागतील.

1 जानेवारी  2018 पासून पॅनिक बटणासह प्रत्येक मोबाइलमध्ये जीपीएसची सोय असलीच पाहिजे असा नियम एप्रिल 2016मध्ये दूरसंचार विभागाने जाहीर केला होता. त्यावर भारतात आता कुठे दूरसंचार क्षेत्र वेगाने विकसित व्हायला लागले असताना, साध्या फोन्समध्येही जीपीएस लावल्यामुळे त्याच्या किमती वाढतील आणि त्याचा फटका पूर्ण दूरसंचार उद्योगाला बसेल अशी भीती आयसीएने ट्राय (दूरसंचार नियामक मंडळ)कडे केली होती. तसेच या नियमावर पुनर्विचार करण्याचे आदेश ट्रायने दूरसंचार विभागाला द्यावेत अशी विनंती केली होती. त्यानंतर दूरसंचार खात्याचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांना पत्र लिहून, या निर्णयामुळे 500 ते 700 रुपयांमध्ये मिळणाऱ्या हॅंडसेटची किंमत 950 ते 1150 इतकी होईल असेही सांगितले होते. 

जीपीएसबाबत ट्राय आणि दूरसंचार विभागाने नेहमीच वेगवेगळी आणि सतत बदलती भूमिका घेतली आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये ट्रायने प्रत्येक मोबाइलमध्ये जीपीएस असावा अशी मागणी लावून धरली होती, तेव्हा दूरसंचार विभागाने असा निर्णय त्याच्या परिणामांचा विचार केल्याशिवाय घेतला जाऊ नये सांगत ती फेटाळली होती. इतकेच नव्हे तर अनेक लोक जीपीएस नसलेले फिचर फोन्स वापरतात असे मत दूरसंचार विभागाने मांडले होते. 2013 साली याच विभागाने मोबाइल तयार करणाऱ्या कंपन्यांना लवकरात लवकर फोनमध्ये लोकेशन बेस्ड सर्व्हर बसवण्याचे आदेश दिले होते.
 
आता लवकरच व्हॉट्सअॅप वर शेअर करा काहीही
व्हॉट्सअॅपवर चुकून पाठवलेला मेसेज करा डिलीट, लवकरच येणार नवं फीचर
 
जीपीएस बंधनकारक केल्यामुळे हॅंडसेटच्या किमती वाढणार आहेत, त्याहून आणखी एक भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत ती म्हणजे गोपनियतेची. केवळ देशाच्या सुरक्षेसाठी लोकांची सर्व माहिती पाहण्याच अधिकार सरकारकडे जाईल का ? तसेच गोपनियतेचे काय होणार असेही प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत.