जिल्ह्यात एकही गाव आदर्श दिसलेे नाही ग्राम स्वच्छता पाहणी समितीचे मत : ४० गावांचे गुणांकन करून जि.प. सीईओंना अहवाल सादर; हगणदरींचा प्रश्न
By admin | Published: October 30, 2015 11:56 PM
सोबत फोटो-
सोबत फोटो-जळगाव- जिल्ह्यातील कमाल भाग सधन आहे. पण शौचालयांबाबत स्थिती फारशी बरी नाही. हगणदरींचा प्रश्न आहे. जिल्ह्यात एकही आदर्श गाव (मॉडल व्हीलेज) आम्हाला पाहणीदरम्यान दिसले नाही. काही गावांमध्ये शाळांची स्वच्छता, दलित वस्तींची कामे चांगली आहेत, असे मत जिल्ह्यात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणीसाठी सातारा येथून आलेल्या समितीचे प्रमुख तथा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. या समितीने बुधवार व गुरुवारी जिल्ह्यात ४० गावांची संत गाडगेबाबात ग्राम स्वच्छता अभियानासंबंधी पाहणी केली. या गावांची पाहणी करून समितीने गुणांकन केले व आपला अहवाल सीईओंना सादर केला. या पाहणीसंबंधी समितीने वार्तालाप केला. या वेळी सातारा जि.प.चे सीईओ नितीन पाटील, खंडाळा, जि.सातारा पं.स.चे सभापती रमेश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, पत्रकार प्रवीण शिंगटे आदी १५ सदस्य उपस्थित होते. सातारा खूप पुढेशौचालयांच्या लक्ष्यांकात सातारा जिल्हा पुढे आहे. तसे जळगाव जिल्ह्यात दिसले नाही. सातारा जिल्ात ९३ टक्के काम झाले आहे. जळगावात ५० टक्के काम राहीले आहे. यासंदर्भात लोकसहभाग वाढायला हवा, शौचालये वापरासंबंधी ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी, असे मत सोनवलकरांनी व्यक्त केले. कमानीवर ग्रा.पं.ची संकल्पना सातार्यात राबविणारजिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती गावाच्या दर्शनी भागात भली मोठी कमान बांधून त्यावर उभारल्या आहेत. जागा नसली तर ग्रा.पं.उभारण्याची ही संकल्पना उपयोगात येते. ही संकल्पना सातारा येथे राबवू, असे सोनवलकर म्हणाले. काँक्रीटीकर, भुयारी गटारींचे काम चांगलेआमच्या तीन गटांनी पाहणी केली. त्यात दलित वस्ती व गावात इतरत्र बांधलेले सिमेेंटचे रस्ते चांगले आहे. भुयारी गटारी व प्राथमिक शाळांची स्थितीही चांगली आहे. पण शाळांमध्ये शौचालयांचा वापर होत नाही, असे जाणवले. सीईओंकडून सीईओंची स्तुतीसीईओ नितीन पाटील म्हणाले, जळगावच्या सीईओंची भेट झाली. त्यांनी स्वच्छतेसंबंधी चांगला कार्यक्रम आखला आहे. काम हाती घेतले आहे. ते दिसेल. पण ग्रामस्थांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. वित्त आयोगातून जि.प.लाही निधी द्यावापंचायत राज व्यवस्थेत जि.प. महत्त्वाची आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी जि.प.लाही मिळावा, असे सोनवलकर म्हणाले.