स्त्री जन्माचे ग्रँड वेलकम, आजोबांनी बग्गीतून काढली जुळ्या नातींची मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:55 PM2022-01-16T18:55:47+5:302022-01-16T18:59:06+5:30

कोणंद येथे जुळ्या मुलींच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी, बग्गीतून घरी येत असलेल्या मुलींसमोर डान्सही केला. कोणंद गावातील मयूर भायल यांच्या पत्नीने माहेरी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

Grand Welcome to the birth of a woman in Dhar MP, a procession of twin grandchildren pulled out of a buggy by grandparents | स्त्री जन्माचे ग्रँड वेलकम, आजोबांनी बग्गीतून काढली जुळ्या नातींची मिरवणूक

स्त्री जन्माचे ग्रँड वेलकम, आजोबांनी बग्गीतून काढली जुळ्या नातींची मिरवणूक

Next

भोपाळ - मुलींच्या जन्माने धुमधुडाक्यात स्वागत करण्याचा ट्रेंडही सध्या समाजात रुजत आहे. वंशाचा दिवा हवा म्हणून मुलींऐवजी मुलगाच झाला पाहिजे, अशी भावना जुन्या-जाणत्या काही लोकांमध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, स्त्रीभूण हत्यासारख्या घटना वारंवार समाजात घडत आहेत. मात्र, आता समाजमन बदलत असून स्त्री जन्मानचेही जोर-शोर से स्वागत करण्यात येत आहे. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील एका गावात जुळ्या मुलींचे असेच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या मुलींना घरी आणताना बग्गीतून आणले. 

कोणंद येथे जुळ्या मुलींच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी, बग्गीतून घरी येत असलेल्या मुलींसमोर डान्सही केला. कोणंद गावातील मयूर भायल यांच्या पत्नीने माहेरी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. गणेश चतुर्थी दिवशी मुलींना जन्म दिल्यामुळे या दोन्ही मुलींचे नाव रिद्धी आणि सिद्धी असे ठेवण्यात आले. त्यानंतर, 4 महिन्यांनी सून दोन नातींना घेऊन घरी येत असल्याने कुटुंबीयांना त्यांचे ग्रँड वेलकम केले. 

सासरच्या कुटुंबीयांनी डॉल्बी डीजे लावून गावातून तब्बल 2 किमीची लांब मिरवणूक काढली. या मिरवणुकीत कुटुंबीयांनी बग्गीसमोर डान्स केला, फुलांची उधळण करत दोन्ही जुळ्या मुलींचे घरी स्वागत केले. मोहन भायल यांच्या या विचारधारेचं गावकऱ्यांनीही कौतुक केलं. दरम्यान, दीड वर्षांपूर्वीच मोहन भायल यांनी आपल्या मुलीचे लग्नही असेच धुमधडाक्यात लावून दिले होते. 
 

Web Title: Grand Welcome to the birth of a woman in Dhar MP, a procession of twin grandchildren pulled out of a buggy by grandparents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.