संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Diffence Research and Development Organization)च्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL)नं पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आवश्यक पात्रता असलेले उमेदवार 03 मार्च 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, पदवीधर शिकाऊ उमेदवारांची 8 पदं आणि डिप्लोमा अप्रेंटिसची 9 पदं भरली जाणार आहेत.
पदवी/डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रेझ्युमेमध्ये दिलेल्या ऑफर लेटर/मेल आयडीद्वारे सूचित केलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांना सामील होताना 'मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट' सादर करावं लागेल. निवड झाल्यास नोकरीवर रुजू होण्यासाठी अर्जदारांना कोणताही TA/DA देय असणार नाही.
अर्ज कसा करावा-
इच्छुक उमेदवारांनी RAC वेबसाइटवर म्हणजेच, rac.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक आहे. यशस्वी नोंदणीवर, उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जाहिरातीच्या 3 मार्च 2022 पूर्वी लॉग इन करू शकतात.
दरम्यान, डीआरडीओ हे देशाच्या संरक्षणासंबंधी विविध प्रकारचे संशोधन करत असते. तसेच देशाच्या संरक्षणासंबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत करत असते. डीआरडीओ ही संघटना म्हणजे विश्वस्तरावरील हत्त्यारे तसेच विविध उपकरणांचे उत्पादन आपल्या देशात करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचा चेहरा आहे.
डीआरडीओ ही खूप जुनी संघटना आहे. डीआरडीओ ची स्थापना ही 1958 साली देशाच्या सैन्य शक्तीला अधिक बळकट बनविण्यासाठी केली गेली होती. ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करत असते.डीआरडीओची स्थापना ही सुरवातीला प्रयोगशाळांच्या लहान लहान संघटनांनी मिळून झाली होती. परंतु आज वर्तमानात या संघटनेच्या एकूण 51 प्रयोगशाळा सुरू आहेत. ज्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, देशाच्या सुरक्षेसंबंधीची उपकरणे बनविणे इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहेत.