शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 8:41 PM

आज दुपारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला झाला. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत.

Attack on Army Soldiers:जम्मू-काश्मीरमध्ये आज(दि.20) दुपारी लष्कराच्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत 5 जवानांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, एक जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

या घटनेनंतर एडीजीपी जम्मू आणि इतर वरिष्ठ अधिकारी पूंछमध्ये पोहोचले आहेत. लष्कराकडून सांगण्यात आले आहे की, गुरुवारी दुपारी 3 वाजता राजौरी सेक्टरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागली. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत हा दहशतवादी हल्ला झाला.

लष्कराच्या माहितीनुसार, या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या घटनेत शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले आहे.

PAFF म्हणजे काय?पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच PAFF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद समर्थित दहशतवादी संघटना आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरच PAFF चे नाव समोर येऊ लागले. ही दहशतवादी संघटना अन्सार गझवत-उल-हिंदचा मारला गेलेला कमांडर झाकीर मुसा याच्याकडून प्रेरित आहे. हा जागतिक दहशतवादी संघटना अल कायदाचाही एकनिष्ठ मानला जातो.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक