श्रीनगर : लष्कर ए तोयबाच्या प्रमुख दहशतवाद्याला चकमकीत कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना शुक्रवारी यश आले. शहराच्या बाहेरील भागात ही चकमक झाली. मुझफ्फर नाईकू ऊर्फ मुझ्झ मौलवी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. सुरक्षा दलांना गुलझारपुरा दहशतवादी असल्याची माहिती गुरुवारी मिळाली होती. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा देताच मुझफ्फरने ग्रेनेड फेकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, सुरक्षा दलांनी त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. ग्रेनेडच्या स्फोटात कॉन्स्टेबल होशियारसिंग जखमी झाले. दहशतवादी आणि सुरक्षा दलांत काही काळ गोळीबार झाला आणि मुझफ्फरच्या खात्म्याने चकमक संपुष्टात आली. मुझफ्फर सोपोर जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याचा मृतदेह गावी रवाना करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)आरोपपत्रराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्याविरुद्ध शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. अली दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचा संशय असून त्याच्यावर भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अलीला काश्मिरातील याहामा या सीमावर्ती गावात गेल्या वर्षी २४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.अली आणि त्याचे दोन साथीदार १२ व १३ जुलैच्या आसपास भारतात घुसले होते आणि २० जून रोजी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले होते.हे तिघे जेथून घुसले आणि चालत याहामा गावात पोहोचले तो भाग सुरक्षा दलांकडून घुसखोरी प्रतिबंधक कारवाईसाठी सतर्क ठेवला जाईल.>आमदाराच्या घरावर गोळीबारनॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि विधान परिषद सदस्य शौकत अहमद गनाई यांच्या घरावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. गनाई शोपियाँ जिल्ह्यातील झैनापुरा भागातील रहिवासी आहे. अहमद राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सध्या जम्मूत आहेत. अहमद यांच्या निवासस्थानी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेले.
ग्रेनेड फेकून पळणाऱ्या अतिरेक्याला कंठस्नान
By admin | Published: January 07, 2017 4:51 AM