शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

हृदयद्रावक! रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू; 3 दिवसांपूर्वी झालेला प्रेमविवाह, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 9:43 AM

तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे.

बिहारमध्ये एक हृदयदावक घटना घडली आहे. सारण जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री एका बाईकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं 27 नोव्हेंबर म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्य़ू झाला आहे. रिसेप्शनचं सामान खरेदी करण्यासाठी बाईकवरून गेलेल्या तरुणाचा अपघात झाला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोखरेरा बगही गावामध्ये मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दोन बाईकची जोरदार धडक झाली. या अपघातात चार जण गंभीररित्या जखमी झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याचवेळी डॉक्टरांनी नवीन लग्न झालेल्या रोशन नावाच्या तरुणाला मृत घोषित केलं. 

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तीन गंभीर जखमींना आणखी चांगल्या उपचारासाठी पीएमसीएमयेथे रेफर केलं. तसेच जखमींपैकी एक असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बगही गावातील निवासी असलेल्या रोशनचं 27 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. छत्तीसगडच्या रायपूरची रहिवासी असलेल्या पिंकीसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोन्ही कुटुंबाच्या आशीर्वादाने लग्नही केलं. 

30 नोव्हेंबर रोजी पूजा आणि रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. रोशनसह सर्वजण कार्यक्रमाची जोरदार तयारी करत होते. घरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मंगळवारी रोशन आपल्या आईसह बाईकवरून पुजा आणि रिसेप्शनचं काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी भीषण अपघात झाला आणि रोशनने आपला जीव गमावला आहे. त्याची पत्नी पिंकी हिला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"