धक्कादायक! लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाचा मृत्यू, कार सजवायला नेताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:19 IST2021-04-28T15:18:30+5:302021-04-28T15:19:31+5:30
ही घटना मंगळवारी दुपारी अटेरा पोसरा हायवेवर किन्नोठा गावाजवळ घडली. नवदेवाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा सर्वांना धक्का बसला.

धक्कादायक! लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाचा मृत्यू, कार सजवायला नेताना झाला अपघात
आधीच कोरोनाने थैमान घातलं असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून अपघाताच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात लग्नाच्या दिवशी घरावर दु:खाचं सावट पसरलं. इथे नवरीला सार करण्यासाठी कार सजवण्यासाठी नवरेदव कार घेऊन गेला आणि त्याच्या कारचा अपघात झाला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी अटेरा पोसरा हायवेवर किन्नोठा गावाजवळ घडली. नवदेवाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा सर्वांना धक्का बसला.
भिंडच्या कृष्णा कॉलनीमध्ये राहणाऱ्या सोनू वाल्मिकीचं लग्न मुरेना जिल्ह्यातील पोसराच्या कन्नोठ गावात ठरलं होतं. घरातून सोमवारी वरात कन्नोठला गेली होती. सर्व रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पाडलं. पण नवरी सार करणार त्याआधी सोनू म्हणजेच नवरदेव आपल्या आत्याचा मुलगा अरूण(२०), अर्जुन(२२), मनीष (१८), भाओजी राज(२६) यांच्यासोबत कार सजवण्यासाठी पोरसा येथे गेला होता.
कार ड्रायव्हर वीरेंद्र चालवत होता. हे लोक गावातून बाहेर पडून हायवेवर आले इतक्यात एका कारला ओव्हरटेक करताना कारवरील कंट्रोल सुटला आणि कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला जाऊन भिडली. ही टक्कर इतकी जोरात होती की, कारचं मोठं नुकसान झालं. कारमधील सर्व लोक जखमी झाले.
दरम्यान रस्त्याने जात असलेल्या लोकांनी लगेच या घटनेची माहिती १०० नंबर डायल करून दिली. ज्यानंतर सर्वांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सोनूची स्थिती गंभीर होती. त्यामुळे त्याला नंतर ग्वालिअरला रेफर करण्यात आलं. मात्र, त्याने रस्त्यातच शेवटचा श्वास घेतला.