शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

TamilNadu Chopper Crash: ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची झुंज अपयशी; चॉपर अपघातातून बचावलेल्या एकमेव अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:56 PM

CDS Bipin Rawat Chopper Crash: वरुण सिंह यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी; बंगळुरुतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

बंगळुरू: सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या बुधवारी (८ डिसेंबर) हवाई दलाच्या चॉपरला अपघात झाला. त्यामध्ये एकूण १४ जण होते. त्यातील १३ जणांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर बंगळुरूतील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूसोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. भारतीय हवाई दलानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच) तमिळनाडूतील कुन्नरहून वेलिंग्टनला जात असलेल्या सीडीएस बिपीन रावत यांच्या चॉपरला अपघात झाला. अपघातावेळी चॉपरमध्ये १४ जण होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. वरुण सिंह अपघातातून बचावले. मात्र ते गंभीर जखमी होते. गेल्या गुरुवारी त्यांना उपचारांसाठी वेलिंग्टनहून बंगळुरूत हलवण्यात आलं. आठवडाभर ते मृत्यूशी झुंज होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानानं, शौर्यानं देशची सेवा केली. त्यांच्या निधनानं अतिशय दु:खी झालो आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा कधीच विसरू शकणार नाही. त्यांचं कुटुंब आणि मित्रांसोबत माझ्या सहवेदना आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतindian air forceभारतीय हवाई दल