गोलाणीत दगडफेक, दंगलीच्या अफवेने पळापळ एक जण जखमी : एका गटाच्या तरुणांकडून दुकानांवर तुफान दगडफेक, मार्केट क्षणात झाले बंद
By admin | Published: June 24, 2016 9:08 PM
जळगाव: सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे भावना दुखावल्याच्या कारणावरुन शंभर ते दीडशे जणांच्या एका गटाने एकत्र येऊन गोलाणी मार्केटमध्ये घोषणाबाजी करत शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता दुकानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दंगलीची अफवा पसरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ झाली. दुकानदारांनी क्षणात आपआपली दुकाने बंद केली. दगडफेकीत उज्ज्वल पद्माकर शुक्ल (वय ४५ रा.धरणगाव) यांच्या डोक्याला दगड बसल्याने ते जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव: सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे भावना दुखावल्याच्या कारणावरुन शंभर ते दीडशे जणांच्या एका गटाने एकत्र येऊन गोलाणी मार्केटमध्ये घोषणाबाजी करत शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता दुकानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दंगलीची अफवा पसरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ झाली. दुकानदारांनी क्षणात आपआपली दुकाने बंद केली. दगडफेकीत उज्ज्वल पद्माकर शुक्ल (वय ४५ रा.धरणगाव) यांच्या डोक्याला दगड बसल्याने ते जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.धार्मिक भावना दुखावल्याचा आक्षेपार्ह व्हीडीओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अजिंठा चौकात रास्ता रोको व दगडफेक झाली होती. त्या घटनेत दोषी असलेल्यावर कारवाई करावी यासाठी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे पाचशेच्यावर जमाव जमला होता. त्यानंतर काही वेळातच शंभर ते दीडशेजण रिक्षा व दुचाकीने गोलाणी मार्केटमध्ये आले. शिवाजी पुतळ्याच्या रस्त्याच्या दिशेकडून हे तरुण घोषणाबाजी करून गोलाणीत शिरले. दिसेल त्या दुकानात दगडफेक व सामानाची नासधूस करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. प्रत्येकाने आपआपली दुकाने बंद केली. पहिल्या मजल्यावरील साई सागर या दुकानाचे बॅनर फाडून बाहेर चहाच्या टपरीचालकाला मारहाण केली. त्याच्या दुकानातील सामान व फोटो रस्त्यावर फेकून दिले.धावपळ, पळापळ अन् धरपकडकाय प्रकार सुरु आहे, हे कोणालाच कळत नव्हते. दंगलीची अफवा मात्र वेगाने पसरली होती. घटनेचे वृत्त कळताच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी गोलाणीत धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व नियंत्रण कक्षातून आरसीपी तसेच कमांडो पथक दाखल झाले. पोलिसांचा ताफा पाहताच गोंधळ घालणारे पळत सुटले. पोलिसांनी धरपकड करुन काही संशयितांना ताब्यात घेतले.सर्व दुकानदारांनी दुकाने बंद करुन कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशन गाठले.पोलीस स्टेशनसमोर जमावदगडफेक करुन गोंधळ घालणार्यांना पकडून आणल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शेकडो जण पोलीस स्टेशनला आले होते. जमावाला पांगवतांना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी अनेक जणांनी पोलिसांशी वाद घातला. पोलीस स्टेशनला गर्दी होत असताना दुसरीकडे पुन्हा दगडफेक झाल्याची अफवा पसरविली जात होती.