नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही राज्यांत आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने किमतीही वाढल्या आहेत. बव्हंशी राज्य इतर राज्यांतून होणाऱ्या आॅक्सिजनच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. काही राज्यांनी राज्याबाहेर आॅक्सिजनचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना असे न करण्याचे निर्देश दिले.महाराष्टÑ सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातहत राज्याबाहेर आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला होता. आॅक्सिजनच्या उत्पादनापैकी ५० ते ८० टक्के हिस्सा राज्यासाठी राखून ठेवत महाराष्टÑाने ७ सप्टेंबर रोजी आॅक्सिजनचा पुरवठा थांबवल्याने मध्यप्रदेश आणि कर्नाटकाला तुटवड्याला सामोरे जावे लागले. आॅक्सिजन तुटवड्यामुळे मध्यप्रदेशात देवास जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. तथापि, सरकारने या वृत्ताचा इन्कार केला; परंतु आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची कबुली दिली होती.या राज्यांत वाढल्या किमती...उत्तर प्रदेश :छोटा सिलिंडर१३० वरून ३१५ ते ३५० रुपयेसुरक्षा अनामत५ हजारांवरून १० हजार रुपयेबिहार :दहा लिटरचा सिलिंडर७ हजारांवरून ८,५०० रुपयेगुजरात :१ लिटरच्या सिलिंडरची किमत ८.५ रुपयांवरून २८ ते २५ रुपयांनी वाढली.
कोरोनाचे वाढते संकट, तुटवड्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 2:26 AM