शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

जीसॅट- ६ उपग्रह आज झेपावणार

By admin | Published: August 27, 2015 4:27 AM

जीसॅट- ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने बुधवारी २९ तासांची उलटगणती सुरू केली आहे. जीएसएलव्ही- डी ६/ जीसॅट-६ या मिशनच्या तयारीचा आढावा

चेन्नई : जीसॅट- ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने बुधवारी २९ तासांची उलटगणती सुरू केली आहे.जीएसएलव्ही- डी ६/ जीसॅट-६ या मिशनच्या तयारीचा आढावा घेणारी समिती (एमआरआर) आणि प्रक्षेपण मंजुरी मंडळाने (एलएबी) या उलटगणतीला परवानगी दिल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी ४.५२ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही- डी ६ हे प्रक्षेपक यान जीसॅटसह अवकाशात झेपावेल. जीसॅट- ६ हा भारताचा २५ वा भूस्थिर दळणवळण उपग्रह ठरणार असून जीसॅट मालिकेतील १२ व्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणातून इस्रोच्या उपक्रमांना नवी झळाळी लाभणार आहे.

कोणती आहेत वैशिष्ट्ये?जीसॅट- ६ हा उपग्रह एस बँडवरील पाच स्पॉट बीम आणि सी- बँडमधील नॅशनल बीमच्या साह्याने दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणार आहे. या मोहिमेचे आयुष्य ९ वर्षांचे असेल. या क्युबिक आकाराच्या उपग्रहाचे एकूण वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधन असेल. उपग्रहाचे निव्वळ वजन ९८५ किलो राहील. त्यात घडी न होणारा सहा मीटर व्यास असलेला सी- बँड अँटेना आजवरचा सर्वात मोठा अँटेना ठरणार आहे. भारतीय भूभागावर पाच स्पॉट बीम सोडण्यासाठी या अँटेनाचा वापर केला जाईल. स्पेक्ट्रमच्या वापराची वारंवारिता वाढविण्यासाठी या बीमचा वापर केला जाईल. हसन येथील मास्टर कंट्रोल फॅसिलिटीद्वारे(एमसीएफ) या उपग्रहावर नियंत्रण राखता येऊ शकेल. द्रवरूप अ‍ॅपोजी मोटर वारंवार प्रज्वलित करीत कक्षा विस्तार केला जाणार असून अखेरच्या टप्प्यात हा उपग्रह पूर्वेकडे ८३ रेखांशावर वक्राकार भूस्थिर कक्षेत स्थिरावल्यानंतर अँटेना आणि तीन अक्ष काम सुरू करतील.