नवी दिल्ली : गुरुवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत इलेक्ट्रिक (बॅटरीवर चालणाऱ्या) कारवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) १२ टक्क्यांवरून ५ टक्के होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती वित्त मंत्रालयातील सूत्रांनी दिली.नीती आयोगाने २०३० पर्यंत देशातील सर्व पेट्रोल/डिझेल वाहने बंद करून रस्त्यांवर केवळ बॅटरी व जैव इंधनावर चालणारी प्रदूषणरहित वाहने ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक कार विकत घेण्यावर रोख अनुदानसुद्धा जाहीर केले आहे.सध्या सर्व प्रकारच्या कारवर १८ टक्के जीएसटी लागतो. पण विशेष सवलत म्हणून इलेक्ट्रिक कारवर १२ टक्के जीएसटी लागतो. तो आणखी कमी करून ५ टक्के करण्याची योजना आहे. सध्या हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलपुढे विचाराधीन आहे. इलेक्ट्रिक कारवरील कर कमी केले तर जगभरचे बॅटरी व इलेक्ट्रिक कार निर्माते भारतात गुंतवणूक सुरू करतील व त्यामुळे रोजगार निर्मिती होईल अशी सरकारला आशा आहे.बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्नसध्या जगभर इलेक्ट्रिक कारसाठी लागणाºया लिथियम-आयन बॅटरीची किंमत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारमधील एकट्या बॅटरीची किंमत ३० ते ४० टक्के असते. बॅटरीची किंमत कमी झाली तर इलेक्ट्रिक कारसुद्धा स्वस्त होईल असा कार उत्पादकांचा अंदाज आहे.
ई-कारवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:57 AM