ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - कुठल्या वस्तू व सेवांवर किती जीएसटी आहे याबद्दल संभ्रमावस्था असून सोशल मीडियावर उलटसुलट मेसेज फिरत आहेत. या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमने मोबाइल अॅप लाँच केलं आहे.
हे अॅप वापरण्यास अत्यंत सुलभ असून वस्तू आणि सेवांच्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण यादी बघता येईल व कर व अन्य माहिती मिळवता येईल असे सीबीएसईने म्हटले आहे. तसेच जीएसटी म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होता, ड्राफ्ट काय आहे, तरतुदी काय आहेत अशा सगळ्या बाबीदेखील अॅपच्या माध्यमातून पोचवण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एका पाहणीमध्ये जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये जीएसटीसंदर्भात जागरूकता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा अॅपचा मार्ग अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा
GST: नव्या किमती न छापल्यास 1 लाखाचा दंड आणि कारावास
जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत बदल झाले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी वस्तूंवर नवी किंमत छापणं बंधनकारक असून ती न छापली गेल्यास संबंधित कंपनीला एक लाखापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. इतकंच नाहीत दंडासोबत कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली असून कंपन्यांना इशारा दिला आहे.
उत्पादकांना न विकला गेलेला स्टॉक विकण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने समितीची स्थापना केली आहे. तसंच टॅक्ससंबंधी असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी हेल्पलाईनची संख्या 14 वरुन 60 करण्यात आली आहे. हेल्पलाईनवर आतापर्यंत 700 हून अधिक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी मंत्रालयाने अर्थतज्ञांची मदत घेतली आहे.