चित्रकुट (मध्य प्रदेश) - केंद्रात सत्तेत आल्यास विविध वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यासाठी आम्ही पावले उचलू असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मध्यप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. चित्रकुट येथील कामतानाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यांनी गुरुवारी या दौ-याला प्रारंभ केला. ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेऊन व ‘गब्बर सिंग टॅक्स’ आकारून मोदी सरकारने लघु उद्योगांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी नष्ट झाल्या. काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास जीएसटी सुसह्य कसा होईल, यादृष्टीने आम्ही निर्णय घेऊ. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहू.
‘सत्तेत आल्यास जीएसटीमध्ये बदल’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:01 AM