नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यासाठी करावा लागणारा लॉकडाऊन याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. मात्र आता या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध काहीसे शिथिल झाले आहेत. बऱ्याच राज्यांमधील उद्योग पूर्वपदावर आले आहेत. त्याचे परिणाम आता देशाच्या तिजोरीवर दिसत आहेत. केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करातून मिळणारा महसूल वाढला आहे.
ऑगस्टमध्ये मोदी सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून १.१२ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत सरकारचा महसूल ३० टक्क्यांनी वाढला आहे. जीएसटीतून मिळणारा महसूल सलग दुसऱ्या महिन्यात १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. अर्थ मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी दिली आहे. जुलैमध्ये सरकारला जीएसटीच्या माध्यमातून १.१६ लाख कोटींचा महसूल मिळाला होता. ऑगस्टमध्ये यात काहीशी घट झाली आहे. मात्र गेल्या ऑगस्टच्या तुलनेत जीएसटीमधून मिळणारं उत्पादन ३० टक्क्यांनी वाढलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सरकारला जीएसटीतून ८६ हजार ४४९ कोटी रुपये मिळाले होते.गॅस, डिझेल, पेट्रोलमधून मोदी सरकारनं २३ लाख कोटी कमावले, गेले कुठे?; राहुल गांधींचा सवाल
जीडीपीमध्ये मोठी वाढकोरोना संकट काळात जीडीपीच्या आघाडीवर देशाची कामगिरी चांगली झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग २०.१ टक्के इतका राहिला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा पूर्वपदावर आल्याचे संकेत मिळाले आहेत.
मुख्य क्षेत्रातील उत्पादनात वाढदेशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्षेत्रांची स्थितीदेखील सुधारत आहे. प्रमुख ८ क्षेत्रांच्या उत्पादनात ९.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये हाच क्षेत्रांचं उत्पादन ७.६ टक्क्यांनी घटलं होतं.
महागाई कमी झाल्यानं दिलासादेशातील औद्योगिक कामगारांसाठीच्या महागाईचा दर काहीसा कमी झाला आहे. तो ५.२७ टक्क्यांवर आला आहे. खाद्यपदार्थ्यांच्या किमती कमी झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली. जूनमध्ये हाच दर ५.५७ टक्के होता.