नवी दिल्ली : नवा अप्रत्यक्ष कर कसा आकारणार आणि त्याचे अधिकार क्षेत्र कोणते यावरील मतभेद दूर करणे व आदर्श कायद्यांचा विचार करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची दोन दिवसांची बैठक गुरुवारी येथे सुरू झाली. या परिषदेची ही दुसरी बैठक असून अर्थमंत्री अरूण जेटली हे परिषदेचे अध्यक्ष आहेत. परिषदेने गेल्या बैठकीत आदर्श जीएसटी कायद्याची २० प्रकरणे निकाली काढली आणि उर्वरीत सात प्रकरणावर आता चर्चा होईल. तत्पूर्वी, परिषदेने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. सामान्य राज्यांना २० लाख रुपयांपर्यंत तर विशेष दर्जाच्या राज्यांना १० लाख रुपयांपर्यंत जीएसटीच्या करातून वगळण्यात आले आहे. जीएसटी कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे १६ सप्टेंबर २०१७ पर्यंतचा वेळ आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जीएसटी परिषदेची दोन दिवसांची बैठक सुरू
By admin | Published: December 23, 2016 1:53 AM