GST Council meeting latest news: वस्तू आणि सेवा कर परिषदेची (GST Council) आज नवी दिल्लीत ४४ वी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरवरीलजीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
"कोरोना संकटादरम्यान अॅम्ब्युलन्स सेवांनी लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यासाठी त्यावरी जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येत आहे," असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. कोरोना संकटादरम्यान अनेक वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागत होता. परंतु तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. अशा अनेक वस्तू होत्या ज्यावर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता तोदेखील कमी करून ५ टक्के करण्यात आला. Gom नं अनेक सूचना केल्या होत्या त्यावर जीएसटी काऊन्सिलकडून विचार करण्यात आला आहे.
"केंद्र सरकार कोरोनाच्या लसींची खरेदी करून त्या राज्य सरकारांना देत आहे. यामुळे देशभरातील नागरिकांचं लसीकरण होत आहे. आता कोणालाही लस खरेदी करम्याची गरज नाही. केंद्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या लसी या सर्व राज्यांमधील सरकारी रुग्णालये आणि कोरोना लसीकरण केंद्रांवक देण्यात येत आहेत आणि नागरिकांना त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेता येईल," असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
नवे दर ३० सप्टेंबरपर्यंत लागूजीएसटी काऊन्सिलनं ज्यावरील जीएसटीचे दर कमी केले आहेत ते ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. तसंच हँड सॅनिटायझरस टेंपरेचर चेक इक्विपमेंट यावरील जीएसटी दरातही घट करण्यात आली असून ते पाच टक्के करण्यात आलं आहे.