कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. मोदी सरकारने देशात जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटी म्हणजे एकप्रकारे 'ग्रेट सेल्फिश टॅक्स'असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नोटाबंदीविरोधात सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी म्हणजे एकप्रकारची देशावर उद्भवलेली आपत्ती होती. तसेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करणा-या नोटाबंदी विरोधात सोशल मीडियाचा वापर करणा-यांनी येत्या 8 नोव्हेंबरला आपल्या अकाउंटचे प्रोफाईल पिक्चर बदलून काळे पिक्चर ठेवावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्स, ममता बॅनर्जींनी ट्विटरवरुन मोदींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 7:44 PM
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. मोदी सरकारने देशात जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटी म्हणजे एकप्रकारे 'ग्रेट सेल्फिश टॅक्स'असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नोटाबंदीविरोधात सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी म्हणजे एकप्रकारची ...
ठळक मुद्देजीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्सनोटाबंदी म्हणजे देशावर उद्भवलेली आपत्तीप्रोफाईल पिक्चर बदलून काळे पिक्चर ठेवा