नवी दिल्ली - गेल्या काही काळात विविध वस्तूंवर लागत असलेल्या जीएसटीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचं वातावरण असतानाच अजून काही गोष्टींवर जीएसटी लागू होणार असल्याचे समोर आले आहे. चेक बाऊन्स झाल्यास लागणाऱ्या दंडावर जीएसटी लागणार नाही. मात्र हॉटेल आणि टूर ऑपरेटर्सकडून करण्यात आलेली बुकिंग आणि तिकीट रद्द केल्यास लागणाऱ्या रद्दीकरण शुल्कावर जीएसटी भरावा लागेल. बुकिंग दरम्यान जीएसटीचे जे दर असतील. त्याचदराने रद्दीकरण शुल्कावर जीएसटी लागेल. पाणी विजेसारख्या सेवांच्या बिल भरण्यामध्ये उशीर झाल्यास लागणाऱ्या विलंब शुल्कावरही जीएसटी लागेल.
सीबीआयसीने लोकांच्या मनात संभ्रम असलेल्या अनेक बाबींबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सीबीआयसीने स्पष्ट केले की, आईसक्रीम पार्लरमध्ये ६ ऑक्टोबर २०२१ पासून १८ टक्के जीएसटी लागू आहे. ज्या पार्लरनी पाच टक्के दराने आईसक्रीमवर जीएसटी घेतला आहे. तसेच त्यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट घेतलेले नाही. त्यांच्याकडून कुठल्यापी प्रकारची वसुली करण्यात येणार नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई होणार नाही.
आईसक्रीम पार्लरमध्ये जीएसटीबाबत खूप संभ्रमाची स्थिती होते. कारण रेस्टॉरंटमधील भोजनावर ५ टक्के जीएसटी लागलो. मात्र आईसक्रीम पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जात नसल्याने त्याला रेस्टॉरंट मानलं जाणार नाही.
आईसक्रीम पार्लरच्या जीएसटी दरांबाबत खूप वाद निर्माण झाला होता. तसेच अनेक पार्लरना विभागाकडून नोटिस जारी करण्यात आल्या होत्या. तर कुठल्याही प्रकारचे सरकारी नियम जसे की ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेवर कुठलीही जीएसटी लागणार नाही.