नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पुढे गेला. तर आज हा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत देशासाठी एक सुखद बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून होणाऱ्या महसुलानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.एप्रिल महिन्यात कोरोनाचा आकडा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढत असताना आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून प्रथमच सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. याआधी मार्च महिन्यात जीएसटीमधून १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटीमधून मिळणारा महसूल १४ टक्क्यांनी वाढला आहे. ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध!एप्रिलमध्ये जीएसटीच्या माध्यमातून १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील २७ हजार ८३७ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी आहे. तर ३५ हजार ६२१ हजार कोटी रुपये राज्याच्या जीएसटीतून मिळाला आहे. इंटिग्रेटेड जीएसटीच्या माध्यमातून ६४ हजार ४८१ कोटी रुपये (२९ हजार ५९९ कोटी रुपये वस्तूंवरील आयात) आणि सेसच्या माध्यमातून ९ हजार ४४५ कोटी रुपयांचा (९८१ कोटी वस्तूंवरील आयात) महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ७ महिन्यांपासून केंद्राला १ लाख कोटीहून अधिक जीएसटी मिळतो आहे.