शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 7:34 AM

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. तसेच, राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची हॅटट्रिकची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदारांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या या पक्षांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा इशारा दिला आहे अन्यथा लोक त्यांना संपवतील. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. तत्पूर्वी, ते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

केवळ घराणेशाहीतील नेत्यांचा एकत्रित फोटो लोकांचा विश्वास जिंकू शकत नाही

विजय ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकास ही भावना जिंकली आहे. हा निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमच्या लढाईला लोकांचा पाठिंबा दर्शवतो. इंडिया आघाडीला धडा मिळाला आहे की, केवळ घराणेशाहीतील काही नेत्यांना व्यासपीठावर एकत्रित केल्याने चांगला फोटो मिळेल. परंतु, लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत. केंद्राचा विकास आणि लोकांमध्ये कोणीही येऊ नये, अन्यथा जनता त्यांना दूर करेल. लोक आधीच म्हणत आहेत की, राज्यांमध्ये आमची हॅटट्रिक ही लोकसभेतील विजयाची हमी आहे. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपमधील दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांची रविवारी मतमोजणी झाली तर मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. 

महिला, तरुण, गरीब अन् शेतकऱ्यांचे सक्षमीकरण मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या आमच्या अजेंड्याला लोक अधिकाधिक पाठिंबा देत आहेत. भक्कम बहुमत असलेल्या स्थिर सरकारला लोक मतदान करत आहेत हे जग पाहत आहे. स्वार्थी राजकारण आणि राष्ट्रहिताचे राजकारण यातील फरक लोक जाणू शकतात. मजबूत भाजप देशाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास घडवून आणतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी या चार मोठ्या जाती असून त्यांच्या सक्षमीकरणामुळे देशाचे सक्षमीकरण होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल होत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. तथापि, विचारसरणीची लढाई सुरू ठेवू. तेलंगणातील जनतेचा मी खूप आभारी आहे. आम्ही निश्चितपणे तेलंगणाला लोकांचे सरकार देण्याचे वचन पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे मेहनत व पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. - राहुल गांधी, काॅंग्रेस नेते

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक