Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले असून, आणखी चार टप्पे बाकी आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीलोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या, म्हणजेच सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. यासाठी 14 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी 13 मे रोजी पीएम मोदींनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो आयोजित केला आहे. यानंतर 14 मे रोजी ते आपला उमेदवारी दाखल करतील.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये उमेदवारी दाखल करताना केलेले एक विधान खरे ठरताना दिसत आहे. वाराणसीबाबत पीएम मोदी म्हणाले होते की, 'मला इथे ना कोणी पाठवले, ना मी आलो. आई गंगेनेच मला इथे बोलावले आहे.' आता मोदी 14 मे रोजी उमेदवारी दाखल करतील. ज्योतिषशास्त्रानुसार त्या दिवशी 'गंगा सप्तमी'चा आहे आणि याच दिवशी 'पुष्य नक्षत्र'चा अद्भुत संगमदेखील होत आहे. हा संगण यशाची गॅरंटी देतो.
14 मे रोजी 'गंगा सप्तमी' पीएम मोदी 13 मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो करणार असून 14 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्योतिषशास्त्र आणि सनातन धर्मानुसार 14 मे हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी ‘गंगा सप्तमी’ आहे. म्हणजेच या दिवशी गंगा अवतरली होती. या दिवशी कोणतेही काम केल्यास विशेष फळ मिळते. जर आपण नक्षत्रांबद्दल बोललो तर या दिवशी 'पुष्य नक्षत्र' आहे. ‘पुष्य नक्षत्र’ यशाचे प्रतीक असून, या नक्षत्रात कोणतेही काम केल्यास यश मिळते.