शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सराफांच्या पाडव्यावर काळी गुढी

By admin | Published: April 07, 2016 11:50 PM

अहमदनगर : अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सराफ बाजार शुक्रवारी (दि.८) बंद राहणार आहे. सोने खरेदीसाठी पाडव्याच्या मुहूर्ताला प्रथमच ब्रेक लागणार

अहमदनगर : अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सराफ बाजार शुक्रवारी (दि.८) बंद राहणार आहे. सोने खरेदीसाठी पाडव्याच्या मुहूर्ताला प्रथमच ब्रेक लागणार असून, व्यापारी बाजारात काळी गुढी उभारणार आहेत़ साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त. चैत्र प्रतिपदा म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस. या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. लग्न तारखा सुरू असल्याने अनेक जण पाडव्यालाच सोने खरेदीचा मुहूर्त साधतात. अबकारी कराच्या विरोधात एक महिन्यापासून सराफा व्यावसायिकांचा बंद सुरू आहे. महिनाभरापासून बंद असलेली सोन्याची दुकाने गुढीपाडव्याला उघडतील, अशी ग्राहकांची अपेक्षा होती. मात्र तीही यंदा फोल ठरली आहे.सोन्यावरील उत्पादन शुल्काच्या (अबकारी कर) निषेधार्थ सुरू असलेला देशव्यापी बंद गुढीपाडव्यालाही सुरूच ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष व कृती समितीचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सराफांचा देशभर संप सुरू आहे. सराफा व्यावसायिकांचा उत्पादन शुल्काला असलेला विरोध कायम आहे. त्यामुळे हे शुल्क रद्द होईपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार आहे.