शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

एल्गार परिषद : वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक; नक्षली कमांडरचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:16 AM

केंद्रीय समितीचे नेते, प्रमुख नेते आणि पत्रकार यासाठी मदत करत असल्याचाही खुलासा

नवी दिल्ली : नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपासून नजरकैदेत असलेले लेखक आणि कवी वरवरा राव यांचे नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा दावा प्रत्यार्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे. नक्षलवादी वेट्टी रामा याने राव यांचा शहरी नेटवर्क सांभाळण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता, असे तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रामा याने दिलेल्या माहितीमध्ये त्याने 2007 ते 18 पर्यंत अनेक लोकांना नक्षल चळवळीमध्ये भरती केले आहे. तसेच कमांडरचे प्रशिक्षणही अनेकांना दिले आहे. नक्षल चळवळीशी जोडला जात असताना मी 16-17 वर्षांचा होतो. 1995 मध्ये नक्षल चळवळीमध्ये सहभागी झालो. त्यानंतर जवळपास 23 वर्षे जंगलात काढल्याचेही म्हटले आहे. 

यावेळी रामा याला शहरी भागातील नक्षलीबाबत विचारले असता त्याने केंद्रीय समितीचे नेते, प्रमुख नेते आणि पत्रकार यासाठी मदत करत असल्याचा खुलासा केला. तसेच वरवरा राव आणि काही पत्रकारांसारख्या लोकांनी पुढे येत शहरी नेटवर्कसाठी मदत केल्याचे सांगितले. वरवरा राव यांनी चकमकींमध्ये मारल्या जाणाऱ्या कॉम्रेड यांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. या काळात त्यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले. आम्ही संघटनेच्या मजबुतीसाठी आणि सदस्यांसाठी काम केले. मात्र, वरवरा राव यांची अटक आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रत्यार्पणामुळे संघटना कमकुवत बनत चालली असल्याचेही रामा याने सांगितले.  मात्र, रामा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिल्याचे पोलिसांना सांगितले. 

31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पुणेपोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली होती.  त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला कवी वरवरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली होती.

यानंतर देशभरात टीका होऊ लागली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणेPoliceपोलिस