हणजूण : भारत स्वाभिमान किसान पंचायतीतर्फे बियाण्यांपासून बियाणे तयार करण्याच्या उपक्रमा अंतर्गत भारत स्वाभिमान किसान पंचायतीशी सलंग्न असलेल्या शेतकर्यांना पुरविण्यात येणार्या फाऊंडेशन सिडस् (ज्योती बियाणे) चा उपयोग व वापर कसा करावा या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन उद्या दि. १३ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ११ वा सांगोल्डा येथील साईबाबा मंदिरात तसेच सायं. ३.३० वा. हळदोणा येथील पॅरीश सेंटर, तेरेझेना ग्राऊंड येथे घेण्यात येणार्या मार्गदर्शन शिबिरात किसान पंचायतीचे पदाधिकारी तसेच गोवा शेतकी विभाग कार्यालयाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत, असे भारत स्वाभिमान किसान पंचायतीचे गोवा प्रदेश अध्यक्ष कमलाकांत तारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (वार्ताहर)
सांगोल्ड्यात उद्या शेतकर्यांना मार्गदर्शन
By admin | Published: June 13, 2014 1:03 AM