युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:51 PM2022-02-26T15:51:23+5:302022-02-26T16:13:11+5:30

guidelines issued for students coming from ukraine : विमानतळावर RT-PCR कोव्हिड टेस्टचा खर्च मुंबई विमानतळ उचलणार आहे.

guidelines issued for students coming from ukraine vaccination certificate will be shown at the airport | युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

Next

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान AI-1943 बुखारेस्टला पोहोचले आहे. आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचेल. मुंबईत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून परतणाऱ्यांना भारतात पोहोचल्यानंतर कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्र नसेल, तर ते RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट देखील दाखवू शकतात. या दोघांपैकी काहीही नसल्यास, विद्यार्थ्याची कोव्हिड टेस्ट विमानतळावरच केली जाईल.

विमानतळावर RT-PCR कोव्हिड टेस्टचा खर्च मुंबई विमानतळ उचलणार आहे. कोव्हिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्याला पुढील तपासणी आणि  वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी पाठविले जाईल.

याशिवाय, ज्या लोकांनी कोव्हिड लस घेतलेली नाही किंवा ज्यांच्याकडे कोव्हिडचा रिपोर्ट निगेटिव्ह नाही आहे. त्यांना प्रवासापूर्वी हवाई सुविधा पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याची सूट दिली जाईल. असे प्रवासी विमानतळावर प्रवेश करू शकतात. हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे.

दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय अडकले आहेत, बहुतेक विद्यार्थी आहेत. युक्रेनमधील 470 भारतीय विद्यार्थी रोमानियामार्गे आज भारतात पोहोचतील. या विद्यार्थ्यांना घेऊन येणारे एअर इंडियाचे विमान संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईला पोहोचेल.

Web Title: guidelines issued for students coming from ukraine vaccination certificate will be shown at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.