गोरखपूर : गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत. तरीही चौकशीत दोषी आढळणाºयांची गय करणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले.मेडिकल कॉलेजमधील ६३ बालमृत्यूनंतर केेंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हॉस्पिटलला भेट दिली. येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची त्यांनी विचारपूस केली. इन्सेफ्लाइटिसविरुद्ध लढाईचा उल्लेख करताना आदित्यनाथ यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भावनिक होत ते म्हणाले की, या मुद्यावर माझ्यापेक्षा संंवेदनशिल कोण असू शकतो? मी या मुद्यावर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष केलेला आहे. या रोगाची व्यथा माझ्यापेक्षा दुसरे कोण समजू शकते. राज्यातील ३५ जिल्ह्यात ९० लाखांपेक्षा अधिक बालकांच्या लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे.आदित्यनाथ म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय सचिव या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करतील. दिल्लीतील उच्चस्तरीय पथकही याचा तपास करत आहे. या घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय काळजीत आहेत. राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत दिली जात आहे. दिल्लीतील डॉक्टरांचे एक पथक येथे दाखल झाले आहे.व्हायरस रिसर्च सेंटरची स्थापनामेंदूज्वराच्या उपचारासाठी ‘रिजनल व्हायरस रिसर्च सेंटर’ स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यासाठी केंद्र सरकार ८५ कोटी रुपये देणार आहे.डॉ. पी. के. सिंग नवे प्राचार्यबाबा राघव दास मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आर. के. मिश्रा यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता डॉ. पी. के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.१७ बालकांचा मृत्यूबारसे होण्याआधीचतीन आठवड्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने रडून रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटले आहे. मुलाचा फोटो छातीला धरुन ते निर्विकार नजरेने पाहतात तेव्हा सांत्वनासाठी शब्दही उरत नाहीत. बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील त्या बालमृत्यूतील पालकांची अवस्था घटनेतील भीषणता अधोरेखित करते. लक्ष्मी आणि शैलेंदर यांनी आपला मुलगा यात गमावला आहे.
दोषींची गय करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:43 AM