शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

गुजरात : मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात लष्कर, एनडीआरएफची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 7:49 AM

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला.

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.

दरम्यान, बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली. या घटनेतील जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्या राज्यात इतकी मोठी दुर्घटना घडली आहे.

अमित शाहंनी व्यक्त केलं दु:खया प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले ही गोष्ट दुर्दैवी आहे. यात प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली.

रविवारी या ठिकाणी लोक फेरफटका मारण्यासाठी आले होते, तेव्हाच ही घटना घडली. यानंतर अग्निशमन दलाच्या टीम, रुग्णवाहिका, स्थानिक प्रशासन आणि डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहोचली. स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि स्थानिक प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं. लष्कर, हवाईदल, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.

नुकतीच झाली होती दुरूस्तीमोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले. 

१४० वर्षे जुना केबल पूलमोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते. 

ओरेवा ग्रुपकडे होती देखभालीची जबाबदारीमच्छू नदीवरील या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुपकडे सोपविण्यात आली होती. त्यासंदर्भात ही कंपनी व मोरबी नगरपालिकेमध्ये एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीने मार्च २०२२ ते मार्च २०३७ या १५ वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असे या कराराद्वारे ठरविण्यात आले होते. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणे अशी अनेक कामे ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती. मोरबी येथील केबल पूल कोसळण्याच्या घटनेस भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या पुलाच्या केलेल्या दुरुस्तीकामाची नीट पाहणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातAmit Shahअमित शाहHome Ministryगृह मंत्रालय