नवी दिल्ली: गुजरातमधील आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख गोपाल इटालिया यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान मोदींना 'नीच माणूस' म्हटल्यामुळे गुरुवारी दिल्लीत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातच आता गोपाल इटालियाने पंतप्रधान मोदींच्या आईबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये इटालियाने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना 'नीच' म्हटले आणि त्यांची आई हीराबेन यांना 'नौटंकीबाज' म्हटले आहे. हा व्हिडिओ शेअर करत भाजप नेते अमित मालवीय यांनी जोरदार हल्ला चढवला.
आठवडाभरात भाजपने इटालियाचा तिसरा व्हिडिओ समोर आणला आहे. याआधी एका व्हिडीओमध्ये इटालियाने पीएम मोदींना 'नीच टाईप मॅन' म्हटले होते. यानंतर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी मंदिर आणि कथांना शोषणाचा अड्डा असल्याचे सांगून महिलांना तेथे न जाण्याचा सल्ला दिला होता. आता तिसऱ्या व्हिडिओत इटालियाने मोदींच्या आईविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. या व्हिडिओंद्वारे भाजप 'आप'ला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. इटालियाला राष्ट्रीय महिला आयोगाने बोलावले होते. बुधवारी आयोगाच्या कार्यालयात गोंधळ झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी इटालियाला थोड्यावेळासाठी ताब्यात घेतले.
स्मृती इराणींचाही हल्लाबोलकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही इटालियाच्या व्हिडिओवरून मोठा हल्ला चढवला आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. स्मृती यांनी ट्विट केले की, 'अरविंद केजरीवाल, गटारीचे तोंड असलेल्या गोपाल इटालिया ने तुमच्या आशीर्वादाने पीएम मोदींच्या आईला शिवीगाळ केली आहे. मी कोणतीही नाराजी व्यक्त करणार नाही. पण, गुजरातची जनता तुम्हाला पाहून घेईल.''