आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:50 AM2021-07-02T11:50:15+5:302021-07-02T11:52:00+5:30

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी; पण माफी मागत सुटले भाजप नेते; नेमकं घडलं तरी काय? 

gujarat aap drunk worker photo gone wrong bjp apologies for mistake | आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

आपच्या कार्यालयात सापडला मद्यपी कार्यकर्ता; फोटो पाहून भाजप नेते पेटले अन् नंतर माफी मागत सुटले

Next

सूरत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट टक्कर पाहायला मिळाली. मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशी तिहेरी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जोरदार मुसंडी मारत आपनं लक्षवेधी कामगिरी केली. तेव्हापासून आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपनं पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. सूरतमधील आपच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूरतमध्ये नुकत्याच उद्घाटन झालेल्या कार्यालयात एक कार्यकर्ता मद्यधुंद स्थितीत दिसत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत भाजपची खिल्ली उडवली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर फासे उलटे पडले आणि भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी लागली.

सूरतमधील गोपीपुरा भागातील आपच्या कार्यालयातील मद्यधुंद व्यक्तीचा फोटो भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. आपचा कार्यकर्ता मद्यधुंद होऊन पक्ष कार्यालयात आडवा झाल्याचं अप्रत्यक्ष संदेश या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपच्या नेत्यांनी या कार्यकर्त्याचा फोटो पाहून पडताळणी सुरू केली. त्यात हा कार्यकर्ता भाजपचाच असल्याची माहिती समोर आली.

सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर
सूरतच्या गोपीपुरा भागात आपचं कार्यालय आहे. त्याच्या अगदी समोरच भाजपचं कार्यालय आहे. भाजपचा कार्यकर्ता हिमांशु मेहता दारूच्या नशेत आपच्या कार्यालयात जाऊन झोपल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर आणि सत्य समोर आल्यानंतर भाजप नेते बॅकफूटवर आले. आधी तो कार्यकर्ता आमचा नाहीच, असा पवित्रा भाजपनं घेतला. त्यानंतर मात्र भाजप नेते प्रशांत बारोट यांनी माफिनामा लिहिला. यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील माफी मागितली.

Web Title: gujarat aap drunk worker photo gone wrong bjp apologies for mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.