नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत जोरदार पाऊस पडत आहे. गुजरातमधील विविध जिल्ह्यांतही पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते वाहतुकीला देखील मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. राजकोट, जामनगर, गोंडल, मोरबी ते देवभूमीपर्यंत दमदार पाऊस होत आहे. याच दरम्यान साचलेल्या पाण्यात एक रुग्णवाहिका अडकल्याची घटना समोर आली आहे.
राजकोटमध्ये सखल भागत असलेल्या एका पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. रुग्णाला घेऊन जात असताना एक रुग्णवाहिका त्यामध्ये अडकली. स्थानिक लोक आणि प्रशासनाच्या मदतीन शेवटी रुग्णवाहिका दोरीच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं. मात्र यामध्ये असलेल्या रुग्णाचा जीव वाचवणं त्यावेळी अत्यंत महत्त्वाचं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, एक रुग्णवाहिका रुग्णाला रुग्णालयात घेऊन निघाली होती. मात्र पुलाखाली जास्त पाणी साचलेलं होतं. चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ती मध्येच ती बंद पडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने सर्व जण घाबरले. पाणी जास्त असल्याने रुग्णाला बाहेर काढणे देखील शक्य नव्हते. शेवटी दुसऱ्या रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले आणि त्यामधून रुग्णाला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
पाण्यात अडकलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. सखल भागांत साचलेलं पाणी आणि अडकलेल्या वाहनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याच पुलाखाली राज्य परिवहनची बस पाण्यात अडकली होती. बुल्डोजरच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा
CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत
15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...
'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"
Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"