शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:16 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पूल दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या मोरबी (Morbi Bridge Collapse) भागातील माजी आमदार कांतिलाल अमृतिया यांना भाजपाने तिकिट दिले आहे. मोरबी विधानसभेचे विद्यमान आमदार ब्रिजेश मेरजा यांना पक्षाने तिकीट दिले नाही. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ब्रिजेश यांनी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर २०२०च्या पोटनिवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. 

कोण आहेत कांतिलाल अमृतिया?कांतिलाल भाई हे भाजपाचे जुने नेते आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये ते मोरबी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मोरबी पूल दुर्घटनेनंतर कांतिलाल मदत आणि बचाव कार्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मोरबी पुलाच्या दुर्घटनेनंतर त्यांनी ट्यूब घालून पाण्यात उडी मारली होती. त्यांच्या या धाडसामुळे काही लोकांचे प्राण देखील वाचले असल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार, कांतिलाल हे आधी तिकिट मिळवणाऱ्यांच्या यादीत नव्हते, मात्र अपघातानंतर बचाव कार्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

१ आणि ५ डिसेंबरला होणार निवडणुका गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. केंद्रीय निवडणूक समितीने गुजरात निवडणुकीसाठी पक्षाच्या १८२ उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपा अध्यक्ष सीआर पाटील, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Morbi Bridge Collapseमोरबी पूलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी