गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा राजकीय पक्षांचा प्रचारही वेग घेऊ लागला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. राज्यात शुक्रवारी भाजपचे कारपेट बॉम्बिंग होणार आहे. महत्वाचे म्हणजे, राजकारणात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कारपेरेट बॉम्बिंगचा पहिला वापर भाजपनेच केला होता. तेव्हा भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांनी हा शब्द वापरला होता.
भाजपचे दिग्गज नेते करणार प्रचार - गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 89 पैकी 82 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत दिवसभर जबरदस्त प्रचार होईल. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उद्या गुजरात मध्ये असणार आहेत. भाजप उद्या हाच शब्द पुन्हा एकदा आमलात आणणार आहे. एकाच दिवसात पहिल्या टप्प्यातील जवळपास सर्वच जागांवर अनेक मोठे नेते प्रचार करणार आहेत.
या टप्प्यातील 89 जागांपैकी 82 जागांवर भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटन, केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, देशतील विवीध लोकसभा मतदार संघांतील एकूण 46 खासदार आणि राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री, पूर्व मुख्यमंत्री, पूर्व उप मुख्यमंत्री, पूर्व कॅबिनेट मंत्री, राज्यातील खासदार आणि संघटनेतील पदाधिकारी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेतील.
या नेत्यांमध्ये जेपी नड्डा, नितिन गडकरी, नरेंद्र तोमर, अनुराग ठाकुर, जनरल व्हीके सिंह, मनसुख मांडविया, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि लडाखमधील खासदार जमयांग सेरिंग नामग्याल हे विविध भागांत रॅली करतील.
यांच्याशिवाय, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितिन पटेल, पुरुषोत्तम रूपाला, पूनमबेन माडम, माजी कॅबिनेट मंत्री गुजरात सरकार वजूभाई वाला, आरसी फळदू , गणपत वसावा, पुरुषोत्तम सोलंकी यांच्यासह अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करतील आणि सभांना संबोधित करतील. याशिवाय, 19 नोव्हेंबरपासून 21 नोव्हेंबरदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 8 सभांना संबोधित करतील. तसेच रोड शोही करतील.
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होईल आणि 8 डिसेंबरला दोन टप्प्यांत सर्वच्या सर्व 182 जागांवर मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होईल.