शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

गुजरात विधानसभा निवडणूक : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 10:31 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

गांधीनगर -  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून दोघांनीही मतदारांना हे आवाहन केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करताना सांगितलं की, 'आज गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या या सणात सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करतो'.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'मतदारांचा सहभाग लोकशाहीचा आत्मा असतो. गुजरात निवडणुकीत प्रथमच मतदान करत असलेल्या माझ्या तरुण सहका-यांचं स्वागत आणि अभिनंदन. गुजरातच्या जनतेला आवाहन आहे की मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाहीला यशस्वी करा'.

मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. 

18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज  इतर सर्व्हेंप्रमाणेच टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने घेतलेल्या या सर्व्हेमध्येही भाजपाच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेमध्ये गुजरातमध्ये भाजपाला ४५ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. तर इतर पक्षांच्या झोळीत १५ टक्के मते जातील.

मिळणाऱ्या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला १११, काँग्रेसला ६८ तर इतरांना तीन जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हटले आहे. गुजरातमधील विविध भागात जीएसटी तसेच पाटिदारांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न यामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र भाजपाला गाठणे काँग्रेसला शक्य होणार नसल्याचे सर्व्हेत नमुद करण्यात आले आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी