Gujarat Election Result 2022 Live: Hardik Patelने केली मोठी भविष्यवाणी, भाजपाला किती जागा मिळतील तेही सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:26 AM2022-12-08T09:26:47+5:302022-12-08T09:27:18+5:30
मतमोजणीच्या पहिल्या तासाभराच्या कलांमध्ये भाजपाची विक्रमी विजयाकडे वाटचाल
Hardik Patel, Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हार्दिक पटेल यांनी भविष्यवाणी केली आहे की त्यांच्या पक्षाला १३५ ते १४५ पेक्षा जास्त जागा जिंकतील. भाजपाने असा विजय मिळवला तर आजपर्यंतचा सर्वात मोठ्ठा विजय ठरेल. तसेच, राज्यात सातव्यांदा भाजपाचे निर्विवाद सरकार स्थापन होईल, असा विश्वासही हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला. गुजरातमधील सत्ताधारी भाजपाने राज्यात सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते.
Hardik Patel predicts 135 to 145 seats for BJP in Gujarat
— ANI Digital (@ani_digital) December 8, 2022
Read @ANI Story | https://t.co/kXXWjbCbOg#GujaratElection2022#GujaratElectionResultpic.twitter.com/GwXVvTNrOD
मतमोजणीच्या वेळी ANIशी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले, "गुजरातच्या धार्मिक श्रद्धा दुखावणारा पक्ष येथे यशस्वी होऊच शकत नाही. आम्हाला १३५ ते १४५ जागा मिळतील. आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. तुम्हाला काही शंका आहे का? असेल तर आम्हाला शंका नाही. जनतेचा भाजपवर विश्वास आहे कारण पक्षाने आपल्या सत्ताकाळात जनतेला सुरक्षितता आणि सुरक्षा दिली आहे आणि जनतेच्या अपेक्षाही पूर्ण केल्या आहेत."
"कामाच्या जोरावर सरकार स्थापन केले जात आहे. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल किंवा दहशतवादी हल्ले झालेले नाहीत. लोकांना माहिती आहे की भाजपाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. म्हणून ते 'कमळा'चे बटण दाबतात. कारण भाजपामध्ये त्यांचे भविष्य सुरक्षित आहे ते लोकांना माहिती आहे. भाजपाने चांगले प्रशासन केले आणि पक्षसंघटन मजबूत केले. त्यामुळे आता साऱ्यांना भाजपावर विश्वास ठेवावाच लागेल," असेही हार्दिक पटेल म्हणाले.
In Gujarat, BJP leads on 8 seats, Congress 3 and AAP on 1 seat as the counting of votes is underway, as per ECI. pic.twitter.com/pYBeRocJaJ
— ANI (@ANI) December 8, 2022
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या होत्या, त्यापेक्षा काही जागा गमावण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवलेल्या काँग्रेसवर निशाणा साधत हार्दिक म्हणाले की, "पक्षाने गुजरातच्या अभिमानाच्या विरुद्ध काम केले आहे, त्यामुळेच तेथील लोकांनी त्यांना राज्यातून दूर लोटले. काँग्रेसने गुजरातच्या अभिमानाच्या विरोधात काम केले. ते गुजरातींना लक्ष्य करून विधाने करतात. त्यामुळे लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. ज्या नेत्यांकडे दूरदृष्टी नसते ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि देशाला पुढे नेऊ शकत नाहीत.”
यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या हार्दिक पटेल यांनी १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या विरमगाममधून निवडणूक लढवली आहे. या जूनमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे लखा भारवाड आणि आम आदमी पार्टीचे (आप) अमरसिंह ठाकोर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली आहे. सुरूवातीच्या तासाभरात हार्दिक पटेल हे पिछाडीवर होते, पण नंतर ते काही अंशी आघाडीवर असते.
दरम्यान, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस गुजरातमध्ये अंदाजे ५९.११ टक्के मतदान झाले. १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, गुजरातमध्ये एकूण ६३.१४ टक्के मतदान झाले.