अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला असला तरी आम आदमी पक्षाने ५ जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपाला आव्हान देत आपने ५ जागा आणि १३ टक्के मते मिळवली. मात्र गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांसह अनेक बड्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे आपली जागा वाचवू शकले नाहीत त्यांना भाजपाचे उमेदवार मुलुभाई बेरा यांनी मात दिली.
आम आदमी पक्षाने इसुदान गढवी यांना खंभालिया विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आजच्या मतमोजणीमध्ये ते सुरुवातीपासून पिछाडीवर पडले होते. अखेर त्यांना भरून काढता आली नाही. अखेर त्यांना सुमारे १९ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. गढवी यांच्यासोबतच गुजरातमधील आपचे दोन बजे नेते अल्पेश कथिरिया आणि प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनाही पराभूत व्हावे लागले.
आम आदमी पक्षाने पाटीदार समाजाचा गड असलेल्या वराछा विधानसभा मतदारसंघातून पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अल्पेश कथिरिया यांना उमेदवारी दिली होती. तर गोपाल इटालिया यांना कतरगाम येथून उमेदवारी दिली होती.