गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरी आहे. येथे रोड शो आणि जाहीर सभा होत आहेत. यातच, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज रोड शो करत असताना त्यांच्यावर दगडफे कण्यात आली. ते सुरतमध्ये रोड शो करत होते.
माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या ताफ्यावर एका गल्लीतून दगडफेक करण्यात आली. यावेळी केजरीवाल त्यांच्या गाडीत उभे राहून समर्थकांना अभिवादन करत होते. यानंतर, अचानक दगडफेक सुरू झाली. यावेळी दगडफेक करणारे आणि आप समर्थकांमध्ये झटापटही झाली.
सुरतमध्ये जनसभेला केले संबोधित - या रोड शोपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सुरतच्या हिरा बाजारमध्ये एक जनसभेलाही संबोधित केले. येथे व्यापाऱ्यांना 'I Love You' म्हणत भाषणाची सुरुवात केली. यावेळी केजरीवाल म्हणाले, माझ्या दृष्टीने येथे एक-एक व्यापारी हिरा आहे. याच वेळी, कुणालाही सरकारकडून आपले काम करून घेताना कसल्याही प्रकारची समस्या यायला नको असेही केजरीवाल म्हणाले.