- शांतीलाल गायकवाडसुरत : बहुप्रतिष्ठेचा वारछा मतदारसंघ यंदा आम आदमी पार्टीच्या (आप) प्रवेशामुळे जास्तच चुरशीचा ठरला आहे. काँग्रेस व भाजप यांच्यात होणारी पारंपारिक तुल्यबळ लढत आपमुळे तिरंगी झाली आहे.
२००८च्या सीमांकनानंतर निर्माण झालेला वारछा हा मतदारसंघ लेवा पाटीदारांचा म्हणून ओळखला जातो. दोन लाख मतदारांपैकी तब्बल दिड लाखांहून अधिक लेवा पाटीदारांची संख्या येथे आहे. येथे भाजपने कायम काँग्रेसवर विजय मिळवला. सौराष्ट्रातून आलेले हे लेवा पाटीदार आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो आहे.
२०१५मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे येथे किशोरभाई यांना पराभवाचा सामना करावा लागेल अशी स्थिती असताना त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धिरूभाई गजेरा यांना शिकस्त दिली होती. गेल्या निवडणुकीत येथेच राष्ट्रवादी काँग्रेसने विजय महादेव यांना उमेदवारी दिली होती. त्यांना फक्त २६४ एवढे मतदान झाले होते.
कोण आहेत तिघेही पाटीदार उमेदवार?nभाजप : किशोर भाई कनानी, विद्यमान आमदार व माजी मंत्रीप्रचाराचे काय? nभाजपाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी इत्यादी नेते येऊन गेले.nकाँग्रेस : प्रफुल्ल भाई छगनभाई तोगडिया, हे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया यांचे बंधू आहेत. प्रचाराचे काय? nअजूनही सामसुम दिसते. nआप : अल्पेश कथेरिया, हे पाटीदार आंदोलनात हार्दिक पटेल यांच्यासाेबत लढले. प्रचाराचे काय?nअरविंद केजरीवाल यांची रॅली झाली.nमतदार राजू भाई फुलवाले म्हणतात,’’ आपची फक्त हवा आहे. येणार फक्त मोदी. अनेक मतदारांनी यंदा आपले वातावरण चांगले असल्याचे सांगितले, पण ते दबक्या आवाजात, उघडपणे नाही.