Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:51 PM2022-11-03T13:51:01+5:302022-11-03T15:17:36+5:30

Gujarat Assembly elections 2022: भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे

Gujarat Assembly elections 2022: BJP ruled Gujarat since 1995, but in 2017, BJP was stuck inside 'Hundread'; See Congress-BJP journey of vidhansabha election of gujrat | Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

googlenewsNext

Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहासही चर्चेत येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींच्या नेतृत्वात भाजपने १० गुजरातची सत्ता राखली. तर, गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. 

भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, सन २०१७ च्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला १०० जागांवर विजय मिळवणं कठीण बनलं होतं. १९९५ मध्ये गुजरातची विधानसभा जिंकत भाजपने बहुमताने सत्ता काबिज केली. त्यावेळी, बीजेपीला १२१ जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला केवळ ४५ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. इतर पक्षांना एकूण १६ जागा मिळाल्या होत्या. 

त्यानंतर, १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११७ जागांवर विजय मिळवत सत्ता राखली. तर, काँग्रेसला ५३ जागांवर विजय मिळवता आला. पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्यामुळे २००२ साली भाजपने १२७ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले होते. यावेळीही काँग्रेसला केवळ ५१ जांगावरच विजय मिळवता आला. 

२००७ मध्ये भाजपने ११७ जागा जिंकत पुन्हा एकदा कमळ खुलवले. त्यावेळीही काँग्रेसला ५९ जागांवरच समाधान मानावे लागले. म्हणजे १९९५ पासून काँग्रेसला ५० ते ६० हाच आकडा गाठता आला आहे. त्यानंतर, २०१२ मध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्त्वात गुजरातमध्ये ११५ जागांवर विजय मिळवला. तर, काँग्रेसने ६१ जागा जिंकल्या. यावेळी इतर पक्षांना ६ जागा जिंकता आल्या. 

२०१७ मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शतक ठोकण्यापासून थांबवण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले. भाजपने ९९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, काँग्रेसने चांगली आगेकूच केल्याचं पाहायला मिळालं. कांग्रेसने गत पंचवार्षिक निवडणुकीत ७९ जागा जिंकल्या भाजपला टक्कर दिली. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकांची उत्सुकता काँग्रेसला अधिक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद, गुजरातमध्ये आपची एंट्री आणि सत्ताधारी भाजपला असलेले एँटीइन्कमबन्सीमुळे २०२२ ची निवडणूक भाजपला सहज नसणार हे नक्की.  

५ डिसेंबर रोजी मतदान

दरम्यान, गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. 

निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये यंदा ३ लाख २४ हजार नवे मतदार आहेत. तसंच राज्यात एकूण ५१,७८२ मतदान केंद्र सज्ज असणार आहेत. यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था देखील असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. पिण्याचं पाणी, वेटिंग रुम, टॉयलेट, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा यांचा समावेश असणार आहे. तसंच राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचं लाइव्ह टेलिकास्ट देखील होणार आहे.

Web Title: Gujarat Assembly elections 2022: BJP ruled Gujarat since 1995, but in 2017, BJP was stuck inside 'Hundread'; See Congress-BJP journey of vidhansabha election of gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.